Monday, December 8

Tag: सामाजिक

आधुनिक भारताचे सामाजिक क्रांतिकारक- राष्ट्रपिता जोतीराव फुले
Article

आधुनिक भारताचे सामाजिक क्रांतिकारक- राष्ट्रपिता जोतीराव फुले

आधुनिक भारताचे सामाजिक क्रांतिकारक- राष्ट्रपिता जोतीराव फुले(राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले स्मृतिदिन निमित्त विनम्र अभिवादन.! त्यानिमित्ताने हा लेख 'भारताचे महानायक महानायिका' पुस्तकातून देत आहे.-  लेखक:रामेश्वर तिरमुखे,जालना 9420705653.- संपादक)महात्मा जोतीराव फुले हे महान क्रांतिकारक होते.जी क्रांती त्यांनी मानवाच्या स्वातंत्र्य,समता, बंधुता आणि न्याय यावर आधारित राष्ट्रनिर्माण,जी क्रांती सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, साहित्यिक सह मानवी जीवनाच्या सर्वांगीण विकासासाठी होती.जोतीराव फुले यांचा जन्म 11एप्रिल 1827 ला पुणे येथे झाला.त्यांच्या आई चिमनाबाई तर वडील गोविंदराव होत. जोतीराव रांगत असतांनाच त्यांच्या आईचे निधन झाले होते.सगुणाबाई क्षीरसागर या मावस बहिणीने जोतीराव यांचा सांभाळ करण्यासाठी मदत केली होती.गोविंदराव शेती आणि फुलांचा व्यवसाय करत होते. वयाच्या 7व्या वर्षी जोतीराव यांना...
नव्या वर्षाचे सामाजिक संकल्प.! 
Article

नव्या वर्षाचे सामाजिक संकल्प.! 

नव्या वर्षाचे सामाजिक संकल्प.! उद्या १ जानेवारी २०२४, नव्या वर्षाची सुरुवात .... *“रोज नवा सूर्य उगवतो, रोज नवे वर्ष आहे. आठवणीच्या हिंदोळ्यावर, रोज नवा हर्ष आहे. रोज नवा चंद्र उगवतो रोज नवी रात आहे. आभाळातल्या चांदण्यांवर, रोज नवी बात आहे.”* पुस्तकाचे पाने उलटवावी तशी आयुष्याची पाने उलटत जातात, प्रत्येक दिवस रोज नव्या विचारांची मैफिल घेऊन येत असतो. आला दिवस गेला या प्रमाणे जीवनमान मागे पडत चालले आहे. दिवसेंदिवस वातावरणात बदल होत चालला आहे. त्याचा परिणाम मानवी जीवनावर होत आहे. जसजसा काळ बदलला तस तसे जीवनमान बदलत चालले आहे. राहणीमान, खानपान, दळणवळण, संपर्क, गाठीभेटी, सण यात अमुलाग्र बदल होत चालला आहे. या धकाधकीच्या जीवनात एकमेकाकडे बघायला कुणाला वेळ राहिला नाही. घड्याळाच्या काट्याप्रमाणे मानव पळतो आहे. “फक्त कॅलेंडरचे पान बदलत आहे, मात्र दैनंदिन अडीअडचणी तशाच आहेत.”आपण स्वतःमध्ये झाकून ...