मला नको कुठलाही शिक्का : अशोक थोरात यांचा हृदयस्पर्शी लेख
मला नको कुठलाही शिक्का : अशोक थोरात यांचा हृदयस्पर्शी लेखसध्या मी मिक्स कॉलनीत राहतो. मिक्स कॉलनी ह्यासाठी म्हणालो की, मोठया शहरातून सुद्धा जात- धर्म निदर्शक वसाहती आहेत. माझ्या कॉलनीचे नावही हरिओम नगर आहे. माझा पत्ता मात्र पुष्पगंधा कॉलनी असा आहे कारण माझे घर हरीओम नगरातले शेवटचे आहे आणि माझ्या शेजारच्या घरापासून पुष्पगंधा कॉलनी सुरु होते. मला हरीओम पेक्षा पुष्पगंधा नाव सोयीचे वाटले. म्हणून माझा पत्ता ‘अशोक थोरात. पुष्पगंधा कॉलनी ’ असा झाला. एकतर मी देव धर्म इत्यादी काही मानत नाही म्हणून हरीओम नावाची अॅलर्जी, आणि कवी वगैरे असल्यामुळे पुष्पगंधा नावाचे आकर्षण. मला अनेक पत्र ‘ अशोक थोरात. वि.म.वि. अमरावती ’ एवढयाच पत्यावर येतात. ह्याचा अर्थ मी फार प्रसिद्ध व्यक्ति आहे असा नाही तर टपाल भरपूर येत असल्यामुळे पोस्टमन ओळखीचे होऊन जातात आणि वि.म.वि.ला टपाल का...
