Monday, October 27

Tag: #समाजहित उपक्रम

‘…असं कार्य समाजाला दिशा दर्शक! आमदार काशिनाथ दाते यांचे गौरवोद्गार’
News

‘…असं कार्य समाजाला दिशा दर्शक! आमदार काशिनाथ दाते यांचे गौरवोद्गार’

गौरव प्रकाशन पारनेर (प्रतिनिधी): पारनेर तालुक्यातील गटेवाडी येथे उद्योजक संतोष पवार यांनी कै. प्रवीण पवार व कै. सुजित पवार यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्ताने समाजहिताचा उपक्रम राबवत शेतकरी व विद्यार्थी बांधवांना मदतीचा हात दिला. या उपक्रमामध्ये गावातील सर्व शेतकऱ्यांना कृषी फवारणी पंप तर विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले.या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार काशिनाथ दाते उपस्थित होते. आपल्या भाषणात त्यांनी समाजहिताच्या या उपक्रमाचे कौतुक करताना भावना व्यक्त केल्या. “मी अशा प्रकारच्या कार्यक्रमाला पहिल्यांदाच आलो आहे. हजारो रुपये खर्च करून वक्ते बोलावण्यापेक्षा गावातील गरजू शेतकरी व विद्यार्थ्यांना मदतीचा हात देणे ही खऱ्या अर्थाने समाजसेवा आहे. संतोष पवार यांनी दाखवलेला हा मार्ग समाजासाठी दीपस्तंभ ठरेल,” असे दाते यांनी सांगितले.या कार्यक्रमाला तालुका भाजप अध्यक्ष राहुल शिंद...