शिक्षक दिन–समाजाचे शिल्पकार आणि भविष्यवेधी उत्सव
शिक्षक दिन–समाजाचे शिल्पकार आणि भविष्यवेधी उत्सवदरवर्षी ५ सप्टेंबर हा दिवस भारतभर शिक्षक दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. भारताचे माजी राष्ट्रपती, तत्त्वज्ञ आणि महान शिक्षक डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त या उत्सवाला सुरुवात झाली. मात्र शिक्षक दिन हा केवळ औपचारिक सण नाही; तो समाजाच्या प्रगतीचा, संस्कारांचा आणि भविष्यनिर्मितीचा द्योतक आहे. त्यामुळेच आपण त्याकडे भविष्यवेधी उत्सव म्हणून पाहिले पाहिजे.शिक्षक हे फक्त ज्ञान देणारे नसतात, तर ते विद्यार्थ्यांच्या विचारसरणीला आकार देतात. विद्यार्थ्यांमध्ये मूल्ये, चारित्र्य, प्रामाणिकपणा, कर्तव्यनिष्ठा, तसेच समाजाभिमुख दृष्टीकोन रुजविण्याचे काम शिक्षक करतात. आजची विद्यार्थी पिढीच उद्याचा समाज आणि राष्ट्र घडवते, त्यामुळे शिक्षक दिन हा भविष्यातील पिढी घडविणाऱ्या व्यक्तींच्या कार्याचा सन्मान करणारा दिवस ठरतो.आजच्या...
