करजगावचे संघर्षशील व्यक्तिमत्व : सतीश दवणे
करजगावचे संघर्षशील व्यक्तिमत्व : सतीश दवणे
"अच्छे ने अच्छा,
और बुरे ने बुरा जाना मुझे,
क्योंकी जिसकी जितनी जरुरत थी,
उसने उतनाही पहचाना मुझे"ओल्या रांजणाचा काठ कुंभार जितक्या सहजतेने वळवू शकतो, मातीच्या ओल्या गोळ्याला जसा आकार देवू शकतो तेवढ्याच सहजतेने परिस्थितीवर स्वामित्व ठेवून तो ती बदलू शकतो, हवी तशी अनकुल करुन घेऊ शकतो हे सर्व तो त्यांच्या सुप्त व प्रकट सामर्थ्यांच्या, चारित्र्य संपन्नतेच्या, विचाराच्या, सत्कर्माच्या आणि पुरूषार्थाच्या जोरावर साध्य करतो. त्याच्या मनात असणाऱ्या तीव्र इच्छाशक्तीच्या जोरावर आपल्या साध्यास साध्य, सिद्ध करू शकतो. गरींबी, अवहेलना व अपमान, अवतीभवतीची स्थिती, घरच्या पिंजलेल्या भूकेभोवती पिंगा घातलेल्या यातना यातून मनात जिद्द, इच्छाशक्ती पेटून ऊठते व जीवनाचे इप्सित साध्य करण्यासाठी कष्टाची तयारी मनात ठेवून जो वाटचाल करतो तो आपल्या ध्येयसिध्दीपर्यंत पोहचतो ह...
