श्रद्धा आणि अंधश्रद्धा : लिंबाच्या माळीमागील रहस्य जाणून घ्या
श्रद्धा आणि अंधश्रद्धा : लिंबाच्या माळीमागील रहस्य जाणून घ्यामागील आठवड्यामध्ये नेहमीप्रमाणे तुळजाभवानीच्या मंदिरात गेले असता एका महिलेने पुजाऱ्यास विचारले की,"गुरुजी ही लिंबाची माळ देवीला का बरे घातली आहे देवीच्या गळ्यात? अशी माळ याआधी तर कधी पाहिली नव्हती. तेव्हा गुरुजी म्हणाले," कुणी काही नवस केला असेल तर घालतात ते अशी लिंबाची माळ. त्यावर ती उत्तरली दक्षिणात्य मंदिरांमध्ये देवीला लिंबाची माळ घातल्याचं बघितले आहे, ऐकलं आहे परंतु तुळजाभवानीला लिंबाची माळ प्रथमच मी बघते आहे. त्यावर ते म्हणाले, "क्रोधित झाल्यानंतर शरीर तापते. लिंबू थंडावा आणि तरतरी देणारे गुणकारी फळ असल्याने भगवतीचा क्रोध शांत व्हावा तिला थंडावा मिळावा म्हणूनही लिंबाची माळ घातली जाते असे म्हटले जाते".गणेश उत्सवाचे बदललेले स्वरूप.!तसं बघितलं तर लिंबू हे गुणकारी असते. ते थंड आणि तरतरी देणारे फळ. शरीराला थंडावा मिळ...
