Sunday, October 26

Tag: #मोतीराम राठोड

‘वचपा’ कादंबरीचा प्रवास: नांदेड ते मुंबई; राज्यस्तरीय पुरस्कारापर्यंतची साहित्ययात्रा
Article

‘वचपा’ कादंबरीचा प्रवास: नांदेड ते मुंबई; राज्यस्तरीय पुरस्कारापर्यंतची साहित्ययात्रा

'वचपा' कादंबरीचा प्रवास: नांदेड ते मुंबई; राज्यस्तरीय पुरस्कारापर्यंतची साहित्ययात्रा दोन तीन तारखेला मुंबई ठाणेहून सारखं फोन येत होतं. निनावी आसल्यामुळे मी फोन उचललो नाही.शेवटी विवेकनं फोन घेतला.समोरून एक बाई बोलत होत्या.बोलताना त्राससिक आवाजत बोलत होत्या.''दोन दिवसापासून फोन लावत आहे तुम्ही फोन घेत नाही.तुमच्या वचपा कादंबरीला पुरस्कार जाहीर झालेलं आहे.तुम्ही हजर राहणार का ?विवेक माझ्याकडे पहात हसत उत्तर दिलं , " हो ताई मी निश्चित येणार आहे." एका दिवस अगोदर जाण्याचं ठरलं.नातेवाईक मित्रमंडळी यांना भेटता येईल या अपेक्षेने मी दिनांक ४.१० .२०२५ सकाळी लवकर उठलो.घरात कारभारनीचा गजर झाला," मुंबईला जायचं आठ वाजलेत."आणि माझं मन एका वेगळ्याच उत्साहात रमलं.आजचा दिवस माझ्यासाठी साधा नव्हता.माझ्या “वचपा” कादंबरीसाठी मला राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार स्विकारण्यासाठी (मुंबई ) ठाणे गाठायचं होतं.माझ्या...