Monday, October 27

Tag: महिमा

ग्रामीण संस्कृती ; काळाचा महिमा
Article

ग्रामीण संस्कृती ; काळाचा महिमा

ग्रामीण संस्कृती ; काळाचा महिमाफार पुर्वीचा काळ.गावातील कुणीतरी एखाद दुसरा माणुस पुण्या- मुंबईला असायचा.आमच्या गावातील बरेच लोक तेव्हा भिवंडी येथे कामधंद्यासाठी होते.काही लोक शेतीची कामे उरकुन भिवंडी येथे कामासाठी जात असत.त्यामुळे त्यांचे गावी येणे जाणे असे.ज्यांचे कुणी मुंबई,भिवंडीला असे त्यांच्यासाठी त्यांचे लोक रानभाज्या आळवडीची पाने,करटुली,चाव्याचा बार,चाव्याची भाजी,हारब-याची भाजी, हरभरा किंवा गव्हाचा हुळा,तांदुळ व खोब-याची वाफोळी,काकडीची पिसोळी तांदुळ वगैरे गावाहुन पाठवत असत.तसेच एखादी चिठ्ठी लिहुन दिलेली असे.त्याच बरोबर मुंबई किंवा भिवंडीहुन एखादा माणुस गावी जाणार आहे असे समजताच तिकडे राहणारे लोक आपापल्या गावी राहणाऱ्या नातेवाईक,आई वडील,भाऊ वगैरे लोकांना थोडेफार पैसे देण्यासाठी आदल्या दिवशी गर्दी करत.सोबत एखादी चिठ्ठीही पाठवत.त्याबरोबर चहापावडर, एखाद डझन कपड्याचे / अंगाचे साबण,...