Monday, October 27

Tag: #महाराष्ट्र हवामान

नवरात्रीत पावसाचा धडाका! २५ सप्टेंबरपासून महाराष्ट्रात मेघगर्जना आणि विजांसह सरी – IMDचा इशारा
News

नवरात्रीत पावसाचा धडाका! २५ सप्टेंबरपासून महाराष्ट्रात मेघगर्जना आणि विजांसह सरी – IMDचा इशारा

नवरात्रीत पावसाचा धडाका! २५ सप्टेंबरपासून महाराष्ट्रात मेघगर्जना आणि विजांसह सरी – IMDचा इशारामुंबई : नवरात्रोत्सवाला सुरुवात होताच आकाशही रंगतदार होणार आहे. २५ सप्टेंबरपासून महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढेल, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. घटस्थापनेच्या दिवशी मुंबईत हलक्या सरींची शक्यता असली तरी त्यानंतर मेघगर्जनेसह पावसाळी वातावरण राहणार आहे.हवामान विभागाच्या (IMD) अंदाजानुसार, बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या हवामान प्रणालीमुळे २५ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत राज्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडू शकतो. मुंबई, ठाणे, पालघर, पुणे आणि विदर्भ-मराठवाड्यासह अनेक भागात विजांचा कडकडाट व मेघगर्जनेसह मुसळधार सरींची शक्यता आहे.महामुंबई परिसरात काही ठिकाणी जोरदार तर काही भागात हलक्या सरींची नोंद झाली.ढगाळ वातावरण आणि उकाडानवरात्र व दुर्गापूजा दरम्यान ढगाळ वातावरणामुळे उकाड...