Tuesday, November 4

Tag: महाराष्ट्रात बुद्रुक खुर्द अशी अनेक गावे….

महाराष्ट्रात बुद्रुक खुर्द अशी अनेक गावे….
Article

महाराष्ट्रात बुद्रुक खुर्द अशी अनेक गावे….

            महाराष्ट्र भर फिरत असताना तुम्ही अनेक नगरे महानगरे तसेच खेडी पाडी पाहिली असतील परंतु त्याचबरोबर तुम्हाला अशी देखिल गावे दिसली असतील ज्यांच्या नावापुढे बुद्रुक व खुर्द हे शब्द लावलेले असतात. उदाहरणार्थ : पिंपळगाव बुद्रुक-पिंपळगाव खुर्द,गोंदवले बुद्रुक-गोंदवले खुर्द,ऐतवडे बुद्रुक-ऐतवडे खुर्द,आरे बुद्रुक-आरे खुर्द इत्यादी.          मित्रांनो आपल्या महाराष्ट्रात अशी अनेक गावे आहेत ज्यांच्या नावाअगोदर बुद्रुक व खुर्द लावलेले असते. आता तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की अरेच्या ही बुद्रुक आणि खुर्द ही काय भानगड आहे. चला तर मग आज आपण जाणुन घेऊयात बुद्रुक आणि खुर्द यांचा इतिहास.             तर मित्रांनो शिवकाळापुर्वी आपल्या महाराष्ट्रात इस्लामी भाषेचा व सत्तेचा खुप मोठा अमल होता,त्यामुळे सगळीकडे उर्दू मिश्रित किंवा फारशी मिश्रित भाषा बोलली जायची.आदिलशाही,कुतुबशाही व मोघल यांच्या अमलात असल...