द्वितीय महायुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर
द्वितीय महायुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर
जग हे विनाशाच्या उंबरठ्यावर येऊन पडले आहे. राजकारणाच्या स्वार्थी वृत्तीच्या फायद्यासाठी जगावर फार मोठे अरिष्ट लादल्या जात आहे. तिसरे महायुद्ध लढले जाईल का असा प्रश्न जगातील लोकांच्या मनात निर्माण झाला आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या विस्फोटकांनी मानवाचा शाश्वत विकासाला उध्वस्त करण्याचे कुटील डाव जगामध्ये निर्माण होत आहेत. अहंकारी रानटी प्रवृत्ती अनेक नेत्यांच्या अंगात संचारली आहे .युद्ध व त्यांची किती गंभीर परिणाम असतात त्याची प्रचिती ज्यांनी द्वितीय महायुद्ध पाहिले त्यांना नक्कीच आले आहे .डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दुसऱ्या महायुद्धात घेतलेल्या भूमिकेचा परिणाम जागतिक परीप्रेक्षात पडलेला दिसतो. अनेक नेत्यांना त्यांच्या विचारापर्यंत पोचता आले नाही.
द्वितीय महायुद्धातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी घेतलेल्या निर्णयातून त्यांच्या भारतीय स्वात...
