Sunday, October 26

Tag: #मराठी संस्कृती

मराठीची उंची मोठी करूया!
Article

मराठीची उंची मोठी करूया!

मराठीची उंची मोठी करूया!मराठी भाषेकडे लक्ष द्या अशी विनंती करण्याची गरज आज आपल्या सर्वांवर आली आहे. मराठी भाषा मोठी आहे ही बाब सिद्ध करण्याची गरज नसताना आज मोठ्याने ठासून सांगावे लागत आहे की मराठी भाषेला समृद्ध करा. हे आपले किती मोठे दुर्दैव? आपलीच भाषा आज आपल्यासाठी परकी झाली आहे नव्हे ती आपणच परकी करून टाकली मराठी भाषा इतकी समृद्ध असताना मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा अशी मागणी कित्येक वर्ष करावी लागली. पुरावे सादर करावे लागले.मराठी भाषेची प्राचीनता व साहित्य समृद्ध असताना देखील राजकीय अनास्तेपायी व मराठी भाषिकांच्या अनास्थेपायी मराठी भाषेवर अवकळा आली आहे. ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, संत एकनाथ या संतांसह अनेक मराठी साहित्यिकांनी एवढे मोठे काम करून ठेवले आहे की ते साऱ्या जगाने पाहावे.मराठी साहित्याचा इतिहास साधारणपणे १० व्या शतकापासून सुरू होतो, जेव्हा प्राकृत भाषेच्या...
आमचं यवतमाळ
Poem

आमचं यवतमाळ

आमचं यवतमाळआमचं यवतमाळसंजय दत्तने जरी घेतलं    उपहासाने नांवआम्हास मात्र प्रिय आहे       आमचं यवतमाळ गांवभाऊसाहेब पाटणकर,बापुजी अणे, जवाहरलाल दर्डाबावाजी दाते सारखावक्ता नाही खर्डाश्रद्धे विषयी बोलणे नाहीअंधश्रद्धेच्या विरोधी बाणाअभ्यासपूर्ण लिखाण ज्यांचेसुजाण डॉक्टर अशोक राणाढुमणापूरचा मारुती,जिनाचा गणपती,लोहाऱ्याचा महादेवकमी होते काय?                          तुम्हीबी लावलेच नां राजेहो,भुताच्या मंदीराले पायशहरामध्ये वाढत चाललायुवक-युवतींचा पसाराएकट्या "श्याम" च्या मागे पडल्या       ...
श्रद्धा आणि अंधश्रद्धा : लिंबाच्या माळीमागील रहस्य जाणून घ्या
Article

श्रद्धा आणि अंधश्रद्धा : लिंबाच्या माळीमागील रहस्य जाणून घ्या

श्रद्धा आणि अंधश्रद्धा : लिंबाच्या माळीमागील रहस्य जाणून घ्यामागील आठवड्यामध्ये नेहमीप्रमाणे तुळजाभवानीच्या मंदिरात गेले असता एका महिलेने पुजाऱ्यास विचारले की,"गुरुजी ही लिंबाची माळ देवीला का बरे घातली आहे देवीच्या गळ्यात? अशी माळ याआधी तर कधी पाहिली नव्हती. तेव्हा गुरुजी म्हणाले," कुणी काही नवस केला असेल तर घालतात ते अशी लिंबाची माळ. त्यावर ती उत्तरली दक्षिणात्य मंदिरांमध्ये देवीला लिंबाची माळ घातल्याचं बघितले आहे, ऐकलं आहे परंतु तुळजाभवानीला लिंबाची माळ प्रथमच मी बघते आहे. त्यावर ते म्हणाले, "क्रोधित झाल्यानंतर शरीर तापते. लिंबू थंडावा आणि तरतरी देणारे गुणकारी फळ असल्याने भगवतीचा क्रोध शांत व्हावा तिला थंडावा मिळावा म्हणूनही लिंबाची माळ घातली जाते असे म्हटले जाते".गणेश उत्सवाचे बदललेले स्वरूप.!तसं बघितलं तर लिंबू हे गुणकारी असते. ते थंड आणि तरतरी देणारे फळ. शरीराला थंडावा मिळ...
अंगण : पूर्वीची जीवनशैली आणि हरवलेली माणुसकीची उब
Article

अंगण : पूर्वीची जीवनशैली आणि हरवलेली माणुसकीची उब

अंगण : पूर्वीची जीवनशैली आणि हरवलेली माणुसकीची उबअंगण सांगे घराची कळापूर्वी कितीही छोटी घरे असली तरी त्यांच्यात एक साम्य होते, ते म्हणजे प्रत्येक घराला छोटंसं का होईना पण अंगण असायचं.आता काळाच्या ओघात अंगण नावाचं घर नामशेष होत चाललं आहे.जी काही थोडीफार अंगणे उरली आहेत त्यांनी ही आपापली सीमा कुंपणात बंदिस्त करून घेतली आहे.म्हणजे त्यात मोकळेपणा असा उरलेला नाही.पूर्वी अंगणं सजायची माणसांनी आणि बहरायची प्राजक्ताच्या सड्यांनी.उन्हाळा सुरू झाला कि वाळवणं करायची लगबग असायची अंगणात.भल्या पहाटे चुलांगण पेटून त्यावर आधन ठेवलं जायचं आणि मग तो चिक हटणं असो नाही तर मग सोऱ्याने कुरडया करायच्या असो. सगळं अंगण आया बायांनी भरून जायचं,कुणाला वेगळं आमंत्रण द्यायची कधीच आवश्यकता वाटत नसायची. अंगणासाठी सीमा ठरलेली नसायची.तशीच ती सीमारेषा माणुसकीसाठी ही नसायची.रात्रीच्या उकाड्यात तर अंगण हीच हवेशीर ...