मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटलांचा टोकाचा निर्णय; उद्यापासून पाणी पिणंही बंद
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटलांचा टोकाचा निर्णय; उद्यापासून पाणी पिणंही बंदमुंबई : मराठा आरक्षणासाठी आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण तिसऱ्या दिवशीही सुरू आहे. मागण्यांची अंमलबजावणी होत नसल्यामुळे आता त्यांनी आणखी कठोर भूमिका घेतली आहे. पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी जाहीर केले की, “आजपर्यंत मी पाणी घेतले पण उद्यापासून पाणीही बंद करणार आहे. म्हणजेच उपोषण आणखी कडक स्वरूप धारण करेल.”राज्यभरातून मोठ्या संख्येने मराठा बांधव मुंबईत दाखल झाले आहेत. आंदोलकांना उद्देशून जरांगे पाटील म्हणाले, “मराठा समाजाला 70 वर्षांपासून आरक्षण मिळालेले नाही. गोरगरीब मराठा समाजाची वेदना मोठी आहे. ज्यांच्याकडे वाहनं आहेत त्यांनी गाड्या मैदानात लावा आणि रेल्वेने आझाद मैदानावर या, तुमच्या गाड्या सुरक्षित राहतील.”सरकारकडून ठोस निर्णय न घेतल्यामुळे उद्यापासून आमरण उपोषण आणखी तीव्र होणार असल...
