मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश : मराठा आंदोलकांना २ सप्टेंबर दुपारी ४ वाजेपर्यंत हटवा
मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश : मराठा आंदोलकांना २ सप्टेंबर दुपारी ४ वाजेपर्यंत हटवामुंबई : मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनावर मुंबई उच्च न्यायालयाने कडक निर्देश दिले आहेत. न्यायालयाने स्पष्ट केले आहे की, आझाद मैदानाव्यतिरिक्त मुंबईतील अन्य ठिकाणी जमलेल्या आंदोलकांना २ सप्टेंबर दुपारी ४ वाजेपर्यंत हटविण्यात यावे. तसेच मुंबईत येणाऱ्या आंदोलकांना मुंबई वेशीबाहेरच रोखून परत पाठवावे, असेही आदेश खंडपीठाने दिले आहेत.हे वाचा – स्थूलतेचे दुष्परिणाम जाणा ..!न्या. रविंद्र घुगे आणि न्या. गौतम अनखड यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. यात न्यायालयाने निदर्शनास आणून दिले की आंदोलकांनी दिलेल्या परवानगीतील अटींचे उल्लंघन केले आहे. केवळ आझाद मैदानापुरती मर्यादित राहणारी परवानगी असूनही मोठी गर्दी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, चर्चगेट, हुतात्मा चौक परिसरात जम...
