मराठवाड्यात मुसळधार पावसाचा इशारा; लातूर, नांदेड व धाराशिव जिल्ह्यांतील शाळांना आज सुट्टी
मराठवाड्यात मुसळधार पावसाचा इशारा; लातूर, नांदेड व धाराशिव जिल्ह्यांतील शाळांना आज सुट्टीमुंबई : मराठवाड्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. भारतीय हवामान विभागाने आज, 27 सप्टेंबर रोजी लातूर, नांदेड आणि धाराशिव या तीन जिल्ह्यांसाठी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. त्यानुसार खबरदारीचा उपाय म्हणून या तीनही जिल्ह्यांतील शाळांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.लातूर जिल्ह्यासाठी हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केला आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा विचार करून जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी तातडीचा निर्णय घेत सर्व अंगणवाडी, जिल्हा परिषद व नगरपालिका शाळा, खासगी व अनुदानित शाळा, आश्रमशाळा, महाविद्यालये तसेच खासगी शिकवणी वर्ग आणि आयुक्त व्यवसाय व प्रशिक्षण केंद्रांनाही सुट्टी दिली आहे.दरम्यान, नांदेड जिल्ह्यासाठी कालच ऑरेंज अलर...
