भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या लेखणीतील शब्द न शब्द हे अन्यायग्रस्तांन साठी अमृत ठेवा
भिमजयंती निमित्याने
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या लेखणीतील शब्द न शब्द हे अन्यायग्रस्तांन साठी " अमृत ठेवा - यशस्वी व उज्जवल मार्गासाठी "
महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म दिनांक १४ एप्रिल १८९१ रोजी एका गरीब कुटुंबात झाला. त्यांनी आयुष्यभर अपार कष्ट करून ज्ञानसाधना करून अनेक विषयात ज्ञानशांखावर त्यांनी प्रभुत्व संपादन केले याद्वारे त्यांनी स्वतःची शैक्षणिक उन्नती तर साधलीच सोबतच समग्र भारतीयांच्या जीवनात महान क्रांतिकारक बदल घडवून आणण्यासाठी अहोरात्र कष्ट केले.
महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे शोषितांचे मुक्तिदाते म्हणून सुपरिचित आहेत शिक्षणाच्या बळावर एकूणच समग्र भारतीयांच्या जीवनात क्रांतिकारक बदल घडवून आणण्याचे काम महामानव डॉक्टर बाबासाहेबांनी केले असून एक प्रकारे भारताची पायाभरणी केली आहे.अन्यायग्रस्त समाजासाठी त्यांनी मोलाचे अतुलनीय कार्य ...
