Sunday, December 7

Tag: बौद्ध देशांतील ‘पूर्वजांचा स्मृतीदिन’

बौद्ध देशांतील ‘पूर्वजांचा स्मृतीदिन’
Article

बौद्ध देशांतील ‘पूर्वजांचा स्मृतीदिन’

...भाद्रपद पौर्णिमेच्यानिमित्ताने..... बौद्ध देशांतील 'पूर्वजांचा स्मृतीदिन' ( Remembering the Ancestors) ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ बौद्ध जगतामध्ये सप्टेंबर महिन्यातील पंधरवडा पूर्वजांबद्दल श्रद्धा व्यक्त करण्याचा एक सण म्हणून Pchum Ben/ Vu-Lan/ Obon/ Ulambana/ Ancestor Day अशा विविध नावांनी साजरा करतात. आपल्या घरातील पूर्वजांना वंदन करण्याची प्रथा बुद्ध काळातील अडीज हजार वर्षांपासून चालत आलेली होती. अनेक बौद्ध देशांत या पंधरवड्यात पूर्वजांची आठवण म्हणून त्यांना आवडनारे घरगुती पदार्थ तयार करतात. ते तयार केलेले पदार्थ आणि फुले-फळे विहारात, पॅगोडात मांडले जातात. पूर्वजांना व वडिलधाऱ्यानां नमन करतात. भिक्खूंना वंदन करून आशिर्वाद घेतले जातात. त्यांना चिवर दान केले जाते. अशा तऱ्हेने Remembering the Ancestors हा 'सण' म्हणून आनंदाने बौद्ध देशांत साजरा केला जातो.भारतात पाळला जाणारा 'पितृपक्ष' आणि आशिया खंडाती...