Monday, October 27

Tag: बंधन

हरतालिका व्रत ; स्रीयांवरच बंधन ठेवू नये.!
Article

हरतालिका व्रत ; स्रीयांवरच बंधन ठेवू नये.!

हरतालिका व्रत ; स्रीयांवरच बंधन ठेवू नये.!         दरवर्षी हरतालिका येते व सौभाग्यवती स्रीया तसेच कुमारिका मुलीही हा व्रत करतात. कशासाठी? तर इच्छित पती मिळावा. हा इच्छित पती मिळावा म्हणून कुमारीका, तर सौभाग्य अखंड टिकावं म्हणून सौभाग्य वती स्रीया हा व्रत करीत असतात. या दिवशी दिवसभर स्रीया उपवास करतात. रात्रीही त्यांना उपवास असतो. मग शरीरातील पोषकतत्वे कमी झाल्याने चक्कर येतात. यातच जीवही जावू शकतात ही शक्यता नाकारता येत नाही.           सध्या वातावरणाचा कहर सुरु आहे. घरोघरी रुग्ण आहेत. तसं पाहता हा कालच तसा आहे. कधी पाऊस येतो तर कधी नाही. त्यामुळंच आजार. अशावेळी शरीराची प्रतिकारशक्ती तेवत ठेवण्याची आवश्यकता आहे. पण याच काळात उपवास केल्यानं शरीरातील प्रतिकारशक्ती कमी झाल्यास येणा-या संभाव्य धोक्याला कोणताच व्यक्ती वाचविणार नाही नव्हे तर वाचवायला येणार नाही. मग ज्या देवासाठी उपवास केला. तो ...