मी पाहिलेली दुर्गामाऊली…
मी पाहिलेली दुर्गामाऊली...शिवम प्रतिष्ठान घारेवाडी कराड येथे हृदय संमेलनाच्या निमित्ताने जाणं झालं. तिथे जे काही अनुभव आले हे अगदी थोडक्यात सांगायचं तसं कठीणच. पण नवरात्राच्या निमित्ताने मी पाहिलेली दुर्गा मला नमूद करावीशी वाटली म्हणून हा लेखन प्रपंच. आघाद स्मरणशक्ती, अचंबित करणारी कृतिशीलता आणि शब्दातही मांडता येणार नाही अशी जिद्द असणारी ती अगदी तरतरीत आणि अगदी आत्मविश्वासपूर्वक पटपट चालत येऊन स्टेजवर खुर्चीत बसली आणि सगळ्यांच्या नजरा तिच्याकडे फिरल्या.कारण तिच्याकडे पाहिलं की देवानं तिला एका विशिष्ट कार्यासाठी आणि विशिष्ट पद्धतीने बनवले आहे हे नक्कीच लक्षात आलं. जिथे हट्टेकट्टे दोन हात, दोन पाय, डोळे इत्यादी असं समृद्ध शरीर दिलेलं असताना देखील आम्ही कधी त्या विधात्याचे आभार मानत नाही की त्यांची काळजी घेत नाही. कारण त्याचं मूल्य आम्हाला जाणवतच नाही. आमच्यासारख्या सर्वसामा...

