माझे सिनेमा प्रेम…
माझे सिनेमा प्रेम...आमच्या लहानपणात चित्रपट पाहणे सुद्धा वाईटच मानल्या जायचं. फक्त धार्मिक चित्रपट ह्याला अपवाद . ‘ संत सखू ’, ‘ सखू आली पंढरपुरा ’ इत्यादी चित्रपट पाहण्यासाठी खेड्यापाड्यातील लोकांची झुंबड उडायची. शिक्षक आणि थोडे शिकलेले लोक ‘ कुंकू ’ सारखे सामाजिक चित्रपट बघायचे. तसेही खेड्यातल्या लोकांना सिनेमा केवळ यात्रेच्या निमित्तानेच पाहायला मिळायचा.मी केंव्हातरी कौंडण्यपूरच्या यात्रेत ‘ गौरी ’ पाहिल्याचं आठवते. ‘ मोर बोले, चकोर बोले , आज राधाकी नयनोंमें शाम डोले ’ हे त्यातलं प्रसिद्ध गाणं अजून एखादया वेळी रेडिओवर वाजतं. मला थोडाफार कळलेला आणि आवडलेला सुद्धा पहिला सिनेमा म्हणजे ‘ हा माझा मार्ग एकला ’ एकोणीसशे चौसष्ट पासष्ट साली कधीतरी धुळीत गोणपाटावर बसून पाहिला. त्यापूर्वीही असेच धुळीत बसून काही मुके सिनेमे पाहिले होते. तेव्हा ग्रामीण भागातून ‘ विकास ’चे सिनेमे दाखविले जायचे. श...

