14 तास झाडावर बसून पुराशी झुंज – केवड येथील ज्येष्ठाची मध्यरात्री थरारक सुटका
माढा (प्रतिनिधी) : माढा तालुक्यातील सीना नदीला आलेल्या पुरामुळे केवड गावात एक थरारक प्रसंग उभा राहिला. येथील ज्येष्ठ नागरिक कुबेर नामदेव धर्मे हे तब्बल १४ तास झाडावर बसून जीव वाचवण्यासाठी संघर्ष करत राहिले. शेवटी मंगळवारी मध्यरात्री ११:५० वाजता रेस्क्यू टीमने ७५ किलोमीटरचा प्रवास करून त्यांची सुखरूप सुटका केली.सकाळपासून अडकलेले संकटातमंगळवारी सकाळी १० वाजल्यापासून कुबेर धर्मे हे पूरग्रस्त भागात अडकून पडले. वाढत्या पाण्यामुळे त्यांनी जवळच्या झाडावर आश्रय घेतला. नदीच्या पाण्याचा जोर एवढा प्रचंड होता की गावकऱ्यांना त्यांना मदत करणे शक्यच झाले नाही.मोबाईल आणि ड्रोनच्या मदतीने शोधधर्मे यांनी स्वतःच्या मोबाईलवरून काही लोकांशी संपर्क साधला. त्यानंतर प्रशासनाने तातडीने ड्रोन कॅमेराचा वापर करून त्यांचा शोध घेतला. झाडावर अडकलेले असल्याचे स्पष्ट झाल्यावर लगेच रेस्क्यू टीमला खबर देण्या...
