Monday, October 27

Tag: पाऊस

वैष्णोदेवी मंदिर यात्रा 7 दिवसांपासून बंद, पावसामुळे भक्त निराश
News

वैष्णोदेवी मंदिर यात्रा 7 दिवसांपासून बंद, पावसामुळे भक्त निराश

वैष्णोदेवी मंदिर यात्रा 7 दिवसांपासून बंद, पावसामुळे भक्त निराशकटरा (जम्मू काश्मीर): श्री माता वैष्णोदेवी मंदिराची यात्रा सलग सातव्या दिवशीही स्थगित राहिली आहे. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या मुसळधार पावसाच्या इशाऱ्यानंतर प्रशासनाने यात्रेवर बंदी घातली आहे.जम्मू काश्मीरमध्ये गेल्या आठवड्यापासून सतत पाऊस सुरू आहे. या पावसामुळे भूस्खलन व पूरस्थिती निर्माण झाली आहे. यात्रेचा मार्ग धोकादायक झाल्याने प्रशासनाने तात्पुरती यात्रा थांबवली.● हे वाचा – शारीरिक शिक्षणाचे महत्त्व..!हजारो भक्त कटरा, त्रिकुटा डोंगर परिसरात अडकलेले आहेत. हॉटेल्स, धर्मशाळा येथे गर्दी वाढली आहे.रोपवे, हेलिकॉप्टर, बैटरी कार यांसह सर्व सेवा बंद ठेवण्यात आल्या आहेत.अधिकाऱ्यांनी सांगितले की, श्रद्धालूंच्या सुरक्षिततेसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.हवामान सामान्य झाल्यानंतरच यात्रा पुन्हा सुरू केली जाईल....