समाज माध्यमावरील सीरियल्सच्या भावनिक आक्रमणामुळे नवतरुण पिढीच्या मन-मेंदूत सुखी जीवनाची संभ्रमणावस्था!
समाज माध्यमावरील सीरियल्सच्या भावनिक आक्रमणामुळे नवतरुण पिढीच्या मन-मेंदूत सुखी जीवनाची संभ्रमणावस्था!समाज माध्यमे, टीव्हीवर जी काही अनैतिक, असामाजिक तत्त्वांची अकारण पेरणीची माथापच्ची सुरू आहे, याचे सामाजिक परिणाम आता वास्तविक जीवनामध्ये ढवळाढवळ करून तरुणाईच्या मनाची संभ्रमणावस्था वाढविण्यासाठी अधिक पोषक ठरत आहेत; नव्हे, ही पिढी नैराश्याच्या गर्तेमध्येच अधिक वावरताना दिसत आहे.आधीच मोबाईल फोनमुळे इथल्या तरुणांनी घरातील किंवा कुटुंबातील एकमेकांचा संवाद तोडून, आपल्या 'मुठीत' आलेल्या जगाशी 'मुकसंवाद' सुरू केलेला आहे. जवळच्या व्यक्तीशी ते बोलत नाहीत, तर अनोळखी व्यक्तीसोबत ते वारंवार न थकता रात्रंदिवस निष्फळ चर्चा करत असतात आणि आपल्या जीवनाचा अमूल्य वेळ आपल्यासमोर जे वाढून ठेवलेले 'रील' असेल, ते पाहण्यात अकारण गमावत आहेत.टीव्ही वाहिन्यांवर दाखवण्यात येणाऱ्या सिरीयल, ज्यातून अधिकाध...
