नागपूर दीक्षाभूमीवर धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा जल्लोष; विक्रमी गर्दी, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
नागपूर : नागपूरची ऐतिहासिक दीक्षाभूमी पुन्हा एकदा लाखो अनुयायांच्या उपस्थितीने गजबजून गेली आहे. यंदा ६९ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन मोठ्या उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात साजरा होत आहे. दरवर्षी साधारण पाच ते सहा लाख अनुयायी दाखल होतात; मात्र यंदा विक्रमी गर्दी होणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. प्रशासन आणि पोलिस यंत्रणेने या पार्श्वभूमीवर व्यापक तयारी केली आहे.विक्रमी गर्दीची शक्यताडॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीकडून विविध सांस्कृतिक, शैक्षणिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. देशभरातून बौद्ध अनुयायांचा ओघ सुरू झाला असून, यंदा १२ ते १५ लाख अनुयायी नागपूरात दाखल होण्याची शक्यता आहे.पोलिसांचा चोख बंदोबस्तगर्दी नियंत्रणासाठी नागपूर पोलिसांनी विशेष योजना आखली आहे. १२०० पोलीस कर्मचारी व अधिकारी, एसआरपीच्या दोन तुकड्या, २ डीसीपी, ४ एसीपी आणि १०० अधिकारी या ठिकाणी...
