‘विठोबा’ला तरी कोठे, खरे स्वातंत्र्य आहे का?
'विठोबा’ला तरी कोठे, खरे स्वातंत्र्य आहे का?
जसजशी लोकसभेची निवडणूक जवळ येत आहे, तसतशी सज्जन आणि सभ्य लोकांची अस्वस्थता वाढतांना दिसते आहे. तिकडे मंबाजीच्या हालचालीही वाढत आहेत. मंबाजीची पिलावळ सर्वशक्तीनिशी कामाला लागली आहे. त्यांची भिस्त त्यांच्या स्वतःच्या कुटीलपणावर आहे. देशाच्या लुटीतून गोळा केलेल्या पैशावर आहे. द्वेष हा त्यांचा सर्वात मोठा आधार आहे. चन्द्रभागेच्या पाण्यात विष मिसळण्याची धडपड ते जिवाच्या आकांताने करताना दिसत आहेत. पंढरीचे पावित्र्य अबाधित राखण्याची जशी शेवटची संधी वारकऱ्यांसाठी आहे, तशीच मंबाजीच्या पिलांसाठी देखील, पंढरपूर आणि संपूर्ण चंद्रभागा ताब्यात घेण्याची ती शेवटची संधी आहे. दोन्ही बाजुंनी ’करा अथवा मरा’ अशीच २०२४ची लढाई आहे. विमान विकलं, रेल्वे विकली, एलआयसी विकली, जंगलं विकली, समुद्र विकला, तसे पंढरपूर आणि चंद्रभागा अडाणी-अंबानीच्या नावाने करण्याच्या हालचाली स...
