डालड्याचा डब्बा..!
डालड्याचा डब्बा..!
दिवाळी ज्या महिन्यांत असायची त्या महिन्याच्या वाण सामानाच्या यादींत एरवी न येणारे काजू, बेदाणे , बदाम पिस्ते ह्याबरोबरच डालडाचा एक मोठ्ठा डब्बा हमखास असायचा. दिवाळीत डालडाला अनन्य साधारण महत्व असायच.तेल आणि तूप ह्यामधला तो प्रकार, त्याचा तो दंडगोलाकृती आकाराचा पत्र्याचा डबा, पिवळा रंग आणि त्यावरच ते ताडाच का खजुराच्या हिरव्या झाडाच रेखाचित्र......!
एरवीही घरोघरी डालडा असायचाच, त्याचा छोटा डबा रिकामा झाला की त्याच हमखास टमरेल व्हायच आणि दिवाळीत आलेला मोठा डबा रिकामा झाला की त्याची तुळशीची कुंडी व्हायची. तुळशीच लग्न लागून गेलं की त्या कुंडीतली ती तुळसाबाई बिचारी सुकून जायची आणि लाल मातीने भरलेली ती डालडाच्या डब्याची कुंडी हळुहळू गंजत जायची....!
डाएटीशियन नांवाच्या प्रजातीचा तेंव्हा उगम झालेला नव्हता त्यामुळे सर्वसामान्य माणसं पानांत पडेल ते अन्न सुखाने खात होती. “कॅलरी...
