स्त्री शिक्षणाचे आद्य प्रवर्तक महात्मा ज्योतिबा फुले
स्त्री शिक्षणाचे आद्य प्रवर्तक महात्मा ज्योतिबा फुलेविद्येविना मति गेली | मतिविना निती गेली||
नितीविना गति गेली | गतिविना वित्त गेले||
वित्तविना शुद्र खचले | इतके अनर्थ एका अविद्येने केले ||समाजातील माणसाजवळ जर ,शिक्षण नसेल.तर, त्या माणसाची काय अवस्था होत असते.याचं मार्मिक सत्य ज्योतिबांनी समाजास सांगितलं आहे. समाजातील प्रत्येक व्यक्तीने शिकलं पाहिजे.हा महात्मा फुलेंचा ध्यास होता. आणि यासाठीच महात्मा फुलेंनी शिक्षणाची चळवळ उभी केली.१९ व्या शतकातील महात्मा ज्योतिबा फुलेंचा परिवर्तनवादी विचार समाजाला शिकण्याची प्रेरणा देत आहे.हे वाचा - बौद्ध संस्कृती आणि संस्कारभारतीय स्त्रीशिक्षणाचे आद्य प्रवर्तक म्हणून महात्मा ज्योतिबा फुले यांना संबोधले जाते. त्याकाळामध्ये ख्रिश्चन मिशनऱ्यांनी प्रामुख्याने ख्रिश्चन धर्माच्या शिकवणुकीकरिता चालवलेल्या शाळा त्या काळात अस्तित्वात होत्या. पण, बहुजन ...

