सुहागरातची गेली शान; वरानं मिटले डोळे, गेला प्राण!
सुहागरातची गेली शान; वरानं मिटले डोळे, गेला प्राण!जौनपूर (उत्तर प्रदेश): प्रेमाचं वय नसतं, पण त्याला ‘प्राणाचा भाव’ जरूर असतो हे जौनपूर जिल्ह्यातील या घटनेनं ठळकपणे दाखवून दिलं आहे. ७५ वर्षीय संगरू राम नावाच्या वृद्धानं आपल्या वयाच्या निम्म्या ३५ वर्षीय मनभावतीशी लग्न केलं, आणि गावात नव्या आयुष्याचा जल्लोष सुरू झाला. मात्र आनंदाचं हे क्षणक्षणात दु:खात रूपांतर झालं. सुहागरातच्या दुसऱ्याच सकाळी संगरू राम यांचा मृत्यू झाला, आणि संपूर्ण गावात हळहळ व कुजबुज सुरू झाली.संगरू राम हे गौराबादशाहपूर तालुक्यातील कुच्छमुछ गावातील शेतकरी होते. एक वर्षापूर्वी त्यांच्या पहिल्या पत्नीचं निधन झालं होतं. लेकरं नव्हती; शेती, जनावरं आणि एकटेपण हेच त्यांच्या आयुष्याचं साथीदार झालं होतं. घरच्यांनी सांगितलं, “अहो आता वय झालं, लग्नाचं काय?” पण संगरू म्हणाले, “वय वाढलं तरी मन म्हातारं झालं नाही!” आणि मग त्...
