Thursday, November 13

Tag: जीवन…

मानवी जीवन…
Article

मानवी जीवन…

मानवी जीवन..."व्यक्ती तितक्या प्रकृती" सर्वांचे गुणधर्म वेगळे, स्वभाव वेगळे, जसे  निसर्गात उमललेल्या प्रत्येक फुलांचा रंग, गंध वेगवेगळा असतो पण प्रत्येक आपापल्या वेगळ्या रंगरुपाने गंधाने आपले अस्तित्व टिकवून असते. सर्वच जर गुलाब असते तर प्रकृतीत उमलणाऱ्या प्रत्येक फुलांचा वेगळा गुणधर्म आपल्याला कळला नसता; तेव्हा  गुलाबच सुंदर आणि रानात उगवणारी रानफुले ही सुंदर नसतात, किंवा त्यात काहीही चांगला गुणधर्म नसते असे नाही, फक्त त्यांच्यातील सुप्त गुणधर्मांना समजून घेण्याची  आपल्याकडे मानसिक दुष्टी हवी.जसे नानाविध रंगाची गंधाची फुले आहे तशीच सृष्टीवर नानाविध स्वभावाची, स्वरूपाची माणसे सुद्धा आहेत. जेवढे गुण तेवढे दोष असे  गुणदोषांचे समीकरण म्हणजे मानवी जीवन आणि त्यांच्यातील विविधांगी स्वरूपानुसार बनलेला स्वभाव; स्वभावानुसार जगण्याचे विशिष्ट गुणदोष प्रत्येक व्यक्तीत असते, परिपूर्ण असा कुणीच नसतो...