Monday, December 8

Tag: जिव्हाळा..! (पूर्वीचे लग्न)

जिव्हाळा..!  (पूर्वीचे लग्न)
Article

जिव्हाळा..! (पूर्वीचे लग्न)

" बालपणीचा काळ सुखाचा "       [ भाग १ ]"जिव्हाळा" (पूर्वीचे लग्न)आमच्या बालपणी लग्न म्हणजे एक आनंद सोहळा असायचा . लग्न एक महिना लांबच आहे तर जवळच्या पाहुण्यांची जमवाजमव सुरू झालेली असायची . आताच्या काळाएवढी  दळणवळण आणि संदेशवहनाची मुबलकता नसल्याने किमान वीस ते पंचवीस दिवस अगोदर पत्रिका पोहचवणे आणि मु-हाळी जाणे या प्रक्रिया सुरू व्हायच्या. जवळचे नातेवाईक जसे आत्या, मावशी, मावस भाऊ, मावस बहिणी ,आते भाऊ,  आत्या बहिणी, चुलत बहिणी, या किमान आठ ते दहा दिवस अगोदर पोहोचलेल्या असायच्या .घर अगदी भरलेले "गोकुळ " होऊन जायचं .सर्व एकत्र आले म्हणजे चालणाऱ्या गमतीजमती आणि हास्यविनोदात सर्व न्हाऊन निघायचे.त्याकाळात एवढी सधनता ,संपन्नता नसली तरी मनाची श्रीमंती मात्र ओसंडून वाहत होती . बारामाही वाहणाऱ्या नद्यांप्रमाणे. घरामध्ये जरी जागा कमी असायची परंतू मनात प्रेमाची उणीव नसायची.मातीची घरं जाऊन सिमे...