मराठवाड्याच्या तहानलेल्या शिवारांचा कथाकार हरपला!
मराठवाड्याच्या तहानलेल्या शिवारांचा कथाकार हरपला!ज्येष्ठ साहित्यिक प्रा. भास्कर चंदनशिव यांचे लातूर येथील एका खासगी रुग्णालयात आज निधन झाले. जांभळढव्हपासून बिरडं पर्यंतचा प्रवास आज थांबला. धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील हासेगाव येथील ते रहिवासी होते.मराठवाड्याच्या तहानलेल्या मातीला, दुष्काळाने होरपळलेल्या शिवारांना आणि उपाशीपोटीही मुले शिकवणाऱ्या ग्रामीण आईच्या जगण्याला शब्द देणारा सशक्त आवाज आज कायमचा थांबला आहे. ख्यातनाम कथाकार भास्कर तात्याबा चंदनशिव यांच्या निधनाने मराठी साहित्य सजीव कथनकलेचे एक तेज गमावून बसले आहे. त्यांच्या कथांनी केवळ ग्रामीण समाजाचेच नव्हे, तर जातीय, स्त्रीवादी आणि दलित जीवनाचे दु:ख, आशा, संघर्ष आणि मूक करुणा आपल्या समोर उभी केली.१२ जानेवारी १९४५ रोजी उस्मानाबाद जिल्ह्यातील हासेगावात जन्मलेल्या संवेदनशील या बालकाने पुढे मराठी साहित्याला कथाकार भास्कर चंदन...

