यवतमाळ जिल्ह्यात शिक्षकाचा अमानवी अत्याचार : 16 वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू, आरोपी अटकेत
यवतमाळ जिल्ह्यात शिक्षकाचा अमानवी अत्याचार : 16 वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू, आरोपी अटकेतयवतमाळ, ढाणकी: यवतमाळ जिल्ह्यातील ढाणकी गावात धक्कादायक घटना घडली आहे. गुंडेकर कोचिंग क्लासेसचा शिक्षक संदेश गुंडेकर (वय 27) याने आपल्या 16 वर्षीय विद्यार्थिनीवर गेल्या तीन वर्षांपासून अनैतिक संबंध ठेवले होते, असे पोलिसांनी सांगितले. या अत्याचारामुळे पीडित मुलगी चार महिन्यांची गर्भवती झाली.अत्याचार आणि गर्भधारणा लपवण्यासाठी आरोपी शिक्षकाने पीडितेला गर्भपाताच्या गोळ्या दिल्या, मात्र गोळ्यांचा डोस जास्त असल्यामुळे मुलीला प्रचंड रक्तस्त्राव झाला. गंभीर अवस्थेत तिला नांदेड येथील रुग्णालयात दाखल केले गेले. तिथे उपचारादरम्यान मुलीचा मृत्यू झाला.रुग्णालयीन कर्मचाऱ्यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिल्यानंतर बिटरगाव पोलिसांनी आरोपी शिक्षकाला अटक केली. आरोपीविरुद्ध पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदवला ...
