गणेश उत्सवाचे बदललेले स्वरूप.!
भारतीय संस्कृती मध्ये सण उत्सवाला खूप महत्व आहे. मराठी वर्षामध्ये सण उत्सव उत्साहात साजरे केले जातात. स्वातंत्र्यपूर्व काळात लोकांनी एकत्र यावे, विचारांची देवाणघेवाण व्हावी, बिकट परिस्थितीत एकमेकांना मदत करावी, आपुलकी निर्माण व्हावी, कामाच्या व्यापातून थोडाफार विरंगुळा मिळावा, भजन पुजनाने मनातील कर्मठ विचार दूर व्हावे यासाठी लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची परंपरा चालू केली..पूर्वी एक गाव एक गणपती अशी संकल्पना होती. त्यामुळे या उत्सवाबद्दल लोकांच्या मनात खूप उत्सुकता असायची.. सर्व गाव एकत्र येवून गणपती उत्सव साजरा करायचे. गणपती सजावट प्रसाद, हार, तोरण या सर्व गोष्टी एकत्र येऊन करायचे. आरती, भजन, कीर्तन सर्व गाव एकत्र येऊन ऐकायला बसायचे. त्याच निमित्याने आपुलकी, जिव्हाळा वाढायचा दुसरे कुठले विरंगुळ्याचे साधन नसल्याने विचार विनिमय होऊन सामाजिक समस्या, कौटुंबिक समस्या अशा गोष्टी एकत...