नभाला भिडावे निळ्या पाखरांनी : अरुण विघ्ने गझलसंग्रह समीक्षा
नभाला भिडावे निळ्या पाखरांनी : अरुण विघ्ने गझलसंग्रह समीक्षा"माणसाला माणुसपण बहाल करणार्या प्रज्ञासूर्य महामानवाचे विचार मूल्य पेरणारा 'नभाला भिडावे निळ्या पाखरांनी' : विद्रोही कवी साहेबराव मोरेकवी, गझलकार अरूण विघ्ने यांचा "नभाला भिडावे निळ्या पाखरांनी' हा पहिला गझल संग्रह वाचनात आला .सुरेश भट ते भीमराव पांचाळे यांनी मराठी गझल समृद्ध केली, नावारूपाला आणली,आज अनेक नवागत कवी, गझल लेखनाकडे वळले आहेत.भीमराव पांचाळे यांच्या लोकमत मधील गझल संदराने नवागतांना उर्मी दिली.गझल ही कवितेसारखीच कविता असते.तंत्रबद्ध ,भाषिक व्याकरणाचा आकृतीबंध असलेली . गझल हा तंत्रशुद्ध काव्यप्रकार आहे. सुंदर व योग्य शब्दांचा अचूक वापर गझलेत असावा लागतो.अरबीचा प्रभाव हे एक मूलाधार तत्व असल्याने काफिया रदीफ,मिसरा,शेर ,अलामत असे शब्दप्रयोग यमक, अन्त्ययमक,लघु गुरू स्वर यासाठी आले आहेत....
