Monday, October 27

Tag: क्रांतीकारी

सेवालाल : एक क्रांतीकारी संत 
Article

सेवालाल : एक क्रांतीकारी संत 

सेवालाल : एक क्रांतीकारी संत देश म्हणजे देशातील माणसं.मग देशात विविध जाती आहेत. जमाती आहेत. येथे अनेक वंश आहेत, येथे अनेक वर्ग आहेत. येथील विविध जाती विविध धर्मात वाटल्या गेलेल्या आहेत. एकाच धर्मात अनेक जाती जमाती आहेत. धर्म एकच पण जातीची भली मोठी उंच उंच उतरंड आहे. पुन्हा त्यात उपजाती.नारा देताना हम सब एक है. पण बोलणारे नेते, तथाकथीत समाजसुधारक जात पाहून, सोयरे धायरे पाहून, गणगोत पाहूनच व्यवहार करतात.काम पडलं की जातपात धर्म संगळ विसरून आपण एक आसल्याचं नाटक करतात. काम संपलं की गरज सरो वैद्य मरो. आसं पूर्वीपासून चालू आहे. कदाचीत पुढेही चालू राहील. आता तर आपण एकाच धर्माचे आहोत.हा आमचा धर्म आहे म्हणणारे आम्ही सर्व स्पष्टपणे जाती वाटून घेतल्या आहेत.जातीत जन्मलेल्या महापुरुषाला जातीच्या वर्तूळातच बंदी बनवत आहोत. हा आमचा.तो तूमचा.असं चालू आहे. अखील मानवजातीच्या कल्यानासाठी देह झिजविलेल्या सा...