ओला दुष्काळ म्हणजे काय? जाणून घ्या निकष, परिणाम आणि शेतकऱ्यांना मिळणारे फायदे
ओला दुष्काळ म्हणजे काय? जाणून घ्या निकष, परिणाम आणि शेतकऱ्यांना मिळणारे फायदेराज्यात गेल्या काही दिवसांपासून ढगफुटीसदृश्य पाऊस झालाय. हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे. अनेकांचे संसार उध्वस्त झाले आहेत . घरादारांचे मोठे नुकसान झाले असून अनेक जनावरे दगावली आहेत .विशेषतः मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे . या पार्श्वभूमीवर आज राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी होत आहे.पण ओला दुष्काळ म्हणजे नेमकं काय ? ओला दुष्काळ जाहीर करण्याचे निकष कोणते ? जाणून घेण्याचा हा प्रयत्न…खरंतर ओला दुष्काळ जाहीर करण्यासंदर्भात सरकारी दफ्तरात कोणत्याही प्रकारची नियमावली नाही. मात्र यात प्रामुख्याने दोन शब्द वापरले गेले आहेत.पहिला अवकर्षण काळ. ज्यात सरासरीपेक्षा १०% कमी पाऊस झाला तर अवकर्षण काळ असं म्हटलं जातं. तर दहा टक्क्यांपेक्षा अधिक ...
