Sunday, December 7

Tag: कादरीचा

कादरीचा पिंपळ
Article

कादरीचा पिंपळ

कादरीचा पिंपळनारळ फोडले, प्रसाद वाटला, दुकानाचे उद्घाटन झाले, उद्घाटक होते परमपूज्य ब्रह्मानंद स्वामीजी महाराज आणि दुकानाचे नावही त्यांचे दिले होते ते म्हणजे " श्री ब्रह्मानंद स्वामी जनरल स्टोअर्स" दुकानाचे मालक होते जगन्नाथ भिवाजी वाघ, पण त्यांना दोडी गावांमध्ये टोपण नावाने जास्त ओळखले जाते ते म्हणजे 'कादरी'.सुरुवातीला त्यांचा टेलरिंग व्यवसाय होता त्यातून त्यांचं जगणं शिवत गेलं कधी उसवतही गेलं, फाटलेल्या आयुष्याला ठिगळं लावणं आणि ठिगळं लावत आयुष्य जगणं हेच तर टेलरचं खरं आयुष्य असतं, त्यातच मंडपाचा व्यवसाय त्यांनी सुरू केला, हळूहळू व्यवसाय मोठा होत गेला, गावोगाव मंडप जाऊ लागला, नाव मोठं होत गेले, त्याकाळी मंडप व्यवसायात जिल्ह्यात मोठे नाव होते ते म्हणजे नाशिक येथील कादरी यांचा मंडप, आता दोडी गावात जगन्नाथ वाघ यांना त्यांचे नाव न घेता कादरीचा मंडप असे बोलले जाऊ लागले.बत्तीस वर्षांपूर्...