अमरावतीत ओबीसी आरक्षणासाठी आमरण उपोषण; शासन निर्णय रद्द करण्याची मागणी
अमरावतीत ओबीसी आरक्षणासाठी आमरण उपोषण; शासन निर्णय रद्द करण्याची मागणीअमरावती : ओबीसी आरक्षणाच्या विविध मागण्यांसाठी अमरावतीत दोन ओबीसी बांधवांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. ओबीसी आरक्षण संघर्ष समितीचे चंद्रशेखर देशमुख व तुषार वाढवणकर हे अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसले असून त्यांनी शासनाविरोधात ठिय्या आंदोलनाचा इशारा दिला आहे.प्रमुख मागण्या२ सप्टेंबर २०२५ चा शासन निर्णय रद्द करावा – मराठा समाजाला ओबीसी आरक्षणात समाविष्ट करणारा निर्णय मागे घ्यावा.शिंदे समितीच्या ५८ लाख कुणबी नोंदणीची पडताळणी करण्यासाठी उच्चस्तरीय उपसमिती नेमावी.ओबीसी विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती सध्याच्या ५० टक्क्यांवरून १०० टक्के करावी.जातीनिहाय जनगणना तात्काळ सुरू करावी.महा-युती सरकारने भरपाई निधी ओबीसी समाजाला उपलब्ध करून द्यावा.संघर्ष समितीचा इशाराराज्य सरकारने या ...
