चंद्रपूरचे कवी एम. ए. रहीम बंदी यांना राज्यस्तरीय साहित्यभूषण पुरस्कार २०२५
चंद्रपूरचे कवी एम. ए. रहीम बंदी यांना राज्यस्तरीय साहित्यभूषण पुरस्कार २०२५जळगाव : दिनांक २८ सप्टेंबर २०२५, रविवार रोजी जळगाव येथील अल्पबचत भवन, कलेक्टर ऑफिस येथे सकाळी ११ वाजता पार पडलेल्या कार्यक्रमात चंद्रपूरचे ज्येष्ठ कवी एम. ए. रहीम बंदी यांना राज्यस्तरीय साहित्यभूषण पुरस्कार २०२५ प्रदान करण्यात आला. हा सोहळा राजनंदिनी बहुउद्देशीय संस्था, जळगाव यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता.राजनंदिनी बहुउद्देशीय संस्था सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक, प्रशासकीय व विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना दरवर्षी सन्मानित करते. या पार्श्वभूमीवर, कवी एम. ए. रहीम बंदी यांच्या साहित्य क्षेत्रातील उपक्रमशील आणि बहुआयामी कार्याची दखल घेत, त्यांना यंदाचा साहित्यभूषण पुरस्कार देण्यात आला आहे.यापूर्वीही बंदी यांना अनेक मानाचे पुरस्कार मिळाले असून, नुकताच दिनांक २७ जुलै २०२५ रोजी म...
