Monday, October 27

Tag: #आयकर प्रकरण

मृतालाही नोटीस? हायकोर्टाचा आयकर विभागाला झटका!
News

मृतालाही नोटीस? हायकोर्टाचा आयकर विभागाला झटका!

मृतालाही नोटीस? हायकोर्टाचा आयकर विभागाला झटका!मुंबई : मृत व्यक्तीला आयकर विभागाने नोटीस पाठवल्याचा अजब प्रकार नुकताच समोर आला आहे. "मृताच्या नावे आयकर नोटीस पाठवली तर ती कायद्याने ग्राह्य धरता येत नाही" असा ठोस निर्वाळा बॉम्बे हायकोर्टाने देत ही नोटीस रद्द केली आहे. या प्रकरणी हायकोर्टाने आयकर विभागाच्या निष्काळजीपणावर थेट बोट ठेवत विभागाला चपराक दिली.निनांच्या याचिकेतून उघडकीसया प्रकरणाची सुरुवात नीना शाह यांनी दाखल केलेल्या याचिकेतून झाली. नीना शाह यांचे पती जतीन शाह यांचे 23 फेब्रुवारी 2019 रोजी निधन झाले होते. पतीच्या निधनानंतर त्यांनी तत्काळ आयकर विभागाला अधिकृतपणे कळवून याची नोंद करून घेतली होती. मात्र, ही माहिती असूनही आयकर विभागाने 2013-14 या आर्थिक वर्षातील प्रकरणात 24 एप्रिल 2021 रोजी जतीन शाह यांच्या नावेच नोटीस पाठवली.त्या वेळीही नीना शाह यांनी मृ...