Sunday, December 7

Tag: आंबेडकरवादी साहित्य

आंबेडकरवादी साहित्य हेच आमुलाग्र परिवर्तनाचे साहित्य
Article

आंबेडकरवादी साहित्य हेच आमुलाग्र परिवर्तनाचे साहित्य

आंबेडकरवादी साहित्य हेच आमुलाग्र परिवर्तनाचे साहित्य   १४ ऑक्टोबर १९५६ हा दिवस म्हणजे आमच्या उन्नतीचा नवायान होता . धवलमय धरतीवरील धम्मघोष निनादत  होता आणि अंधरूढीची सारी साखळदंड गळून पडले होते. मनूव्यवस्थेच्या पायावर उभ्या अशा हिंदू धर्मातला सोडून नव्या मनुष्यत्वाचा नवाबुद्ध माणूस तयार झाला होता. परिवर्तनाची सारी प्रभा आकाशावर कोरली गेली .कपोलकल्पित , ईश्वराधिष्ठ, अवैज्ञानिक विचारांना मूठमाती देऊन समतेचा धम्मसूर्य नव्याने तेजाळत होता. नागपूरच्या धम्मदीक्षेचा मंगलमय क्षण जगताच्या आकाशावर कोरला  होता .  तथागत गौतम बुद्ध यांचा बुद्ध धम्म हा मानवाची पुनर्रचना करणारा मानवतावादी धम्म आहे. स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय, प्रज्ञा शील, करुणा यांची महाऊर्जा देणारा, स्वयं दीप व्हा..! असा संदेश देणार आहे. बौद्ध धम्म हा ब्राह्मणीकरण्याच्या प्रक्रियेने लयास गेला होता. पण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यां...