नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी भरपाई – कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंचं आश्वासन
मुंबई : राज्यातील विविध भागांमध्ये मागील काही दिवसांपासून अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. सोयाबीन, कपाशी, मका, भात, भाजीपाला आणि फळबागांसह अनेक पिके पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांच्या हाती आलेले श्रम वाया गेले आहेत. या परिस्थितीमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले असून, सरकारकडून तातडीने मदतीची अपेक्षा आहे.कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी नुकतेच याबाबत भूमिका स्पष्ट केली. त्यांनी सांगितले की, “नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत मिळेल. राज्य सरकारकडून ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी आवश्यक त्या सर्व हालचाली सुरू आहेत. केंद्र आणि राज्य सरकारच्या निकषांची पूर्तता करण्याचा प्रयत्न केला जात आहे.”ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणीसध्या राज्यभरातून १०० टक्के ओला दुष्काळ जाहीर करण्याची जोरदार मागणी होत आहे. अतिवृष्टीमुळे केवळ पिकांचे नुकसान झालेले नाही, तर शेतकऱ...
