सूर…
सूर..माझ्या ताईचं दोन वर्षापूर्वीच लग्न झालं होतं. लग्नानंतर सासरी कसं फटकून वागायचं याबाबत तिच्याकडून मोलाच्या टिप्स मिळत होत्या. लग्नाने फक्त नवरा आपला झालेला असतो, त्यामुळे सासू-सासरे आणि इतर नातेवाईक यांना अजिबात भाव द्यायची गरज नाही. सुरवाती पासूनच त्यांना निग्लेक्ट करत त्यांच्याशी रोखठोक वागायचं, म्हणजे भविष्यात ते डोक्यावर बसू शकत नाहीत हे मी मनावर पक्क बिंबऊन घेतलं होतं.आई सांगत असे. ताईचं लग्न झालं. नवलाईचे नऊ दिवस संपले. संसार सुरु झाला. ज्या सासू-सासरे नामक व्यक्तींना आता पर्यंत कधी पाहिलेही नव्हते त्यांना एकाएकी आई-बाबा म्हणणे तिला खूप जड जात असे. संसाराला दोन वर्ष झालेयत ताईच्या. सासरी अजून पाहिजे तसे सूर जुळले नाहीत तिचे इतरांशी. आता मलाही त्या दिव्यातून जायचे होते.ठरल्या दिवशी मुहूर्तावर अक्षता पडल्या. आमची एवढी सगळी तयारी असूनही ऐन वेळेवर थोडासा गोंधळ उडालाच! पण आईच...