नालंदाच्या इर्षेची धगधगती आग भगवान बुद्धाच्या तत्वज्ञानानेच विझणार
नालंदाच्या इर्षेची धगधगती आग भगवान बुद्धाच्या तत्वज्ञानानेच विझणार मानवाकडे सर्वात मोठा अवगुणाचा घटक म्हणजे इर्षा होय. हा मानवतेला लागलेला कलंक आहे. ईर्षेपोटी माणसाने माणसाचे फार मोठे नुकसान केले आहे. एकदा का माणूस ईर्षेपोटी लागला की तो सर्वनाशच करतो. त्याला कुठलेही भान राहत नाही. अशा इतिहासात अनेक घटना ईर्षेपोटी घडल्या आहेत. मानवानेच मानवाचे नुकसान केले आहे.
इर्षा म्हणजे आपल्याकडे नसलेल्या गोष्टीची ओढ होय. इर्षा म्हणजे कुणाचे चांगले पाहून होणारे दुःख होय. ह्याचा आपल्याला रोजच्या जीवनामध्ये अनुभव येत असतो. ही इर्षा प्रत्येक ठिकाणी असते. ती कुटुंबात, समाजात, जाती-पातित, धर्मा-धर्मात व देशात-देशात सुद्धा असते आणि ह्या इर्षे पोटी मानवजातीचे फार मोठे नुकसान झाल्याचे इतिहासावरून आपल्याला बघायला मिळते. त्यातील एक मोठे उदाहरण म्हणजे विश्वख्यातीचे नालंदा विश्व विद्यापीठ आगीत भस्मसात झाले हे होय....

