डॉक्टर तुम्ही सुध्दा ?
डॉक्टर तुम्ही सुध्दा ? अनेक वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारे अनेक जण माझे मित्र आहेत.. Highly qualified म्हणावं तर फक्त डीग्रीने पण विचाराने ?.. मी लैगिंकतेवर जितकी बोलते लिहीते तितकीच अध्यात्मावर लिहीते बोलते.. दोन्हीत नक्कीच आनंद आहे पण अध्यात्मातील आनंद हा शाश्वत आहे.. जिथे दुख अजिबात नाही आणि त्यासाठी संसार सोडायची गरज नाही.. मग काय सोडायचय तर वाईट विचार .. चांगलं राहुन उत्तम संसार करुन आपल्याला नेमुन दिलेलं काम करत आपण भगवंताचं नामस्मरण करत राहिलो तर नुकसान नाही उलट आनंदच आहे.. अध्यात्माने आपण आतुन शांत होतो.. समाधानी, आनंदी राहायला हरीनाम खूपच उपयोगी आहे... काल मी माझ्या डॉक्टर मित्राला भेटले.. जवळपास तासभर आम्ही सोबत होतो.. आमचे काही कॉमन फ्रेंड्स आहेत त्यामुळे काही कॉमन विषय निघतात.. अनेक विषयांवर चर्चा होते .. कधी मला त्यांच्याकडून काही मिळतं , कधी ते माझ्याकडून क...
