Sunday, October 26

१ एप्रिल २०२६ पासून डिजिटल पेमेंट अधिक सुरक्षित; RBI आणत आहे नवी द्वि-घटक प्रमाणीकरण यंत्रणा

१ एप्रिल २०२६ पासून डिजिटल पेमेंट अधिक सुरक्षित; RBI आणत आहे नवी द्वि-घटक प्रमाणीकरण यंत्रणा

RBI Rule for Digital Payment : मुंबई : डिजिटल पेमेंट वापरकर्त्यांसाठी एक मोठी बातमी आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजे RBI ने डिजिटल पेमेंट नियंत्रित करणाऱ्या नियमांमध्ये महत्त्वपूर्ण बदल केले आहेत, जे पुढील वर्षी 1 एप्रिलपासून लागू होणार आहेत. गुरुवारी, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने पेमेंट प्रमाणीकरणाबाबत नवीन मार्गदर्शक तत्त्वांचा मसुदा जारी केला.

डिजिटल व्यवहारांना अधिक सुरक्षित करण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) मोठा निर्णय घेतला आहे. वाढत्या आर्थिक फसवणुकीच्या आणि सायबर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँक १ एप्रिल २०२६ पासून द्वि-घटक प्रमाणीकरण (Two-Factor Authentication) अनिवार्य करणार आहे.

याअंतर्गत ग्राहकांना फक्त SMS OTP वर अवलंबून राहावे लागणार नाही. व्यवहार ओळखण्यासाठी आता पासवर्ड, फिंगरप्रिंट, फेस आयडी, बायोमेट्रिक्स अशा अनेक अतिरिक्त पद्धतींचा वापर करता येणार आहे. यामुळे डिजिटल पेमेंट करताना ग्राहकांची ओळख अधिक खात्रीशीरपणे पटेल आणि आर्थिक सुरक्षेला नवी दिशा मिळेल.

RBI च्या या उपक्रमामुळे ग्राहकांना केवळ सुरक्षिततेची हमी मिळणार नाही, तर सोयीसुविधा देखील वाढतील. कारण व्यवहार करताना वापरकर्ते आपल्या सोयीनुसार अतिरिक्त प्रमाणीकरण पद्धत निवडू शकतील.

तज्ज्ञांच्या मते, फिशिंग, फसवणूक करणारे फोन कॉल्स, फेक लिंक्स आणि हॅकिंगच्या घटना गेल्या काही वर्षांत झपाट्याने वाढल्या आहेत. त्यामुळे ग्राहकांचा डिजिटल व्यवहारांवरील विश्वास कमी होऊ नये म्हणून RBI ने हा निर्णायक पाऊल उचलला आहे.

आता २०२६ पासून डिजिटल पेमेंट प्रणाली अधिक सुरक्षित, विश्वासार्ह आणि आधुनिक तंत्रज्ञानाशी सुसंगत होणार आहे.

हे वाचा-सौरऊर्जा-काळाची-गरज

डिजिटल पेमेंटसाठी….

Bandukumar Dhawane

बंडूकुमार धवणेबंडूकुमार धवणे – संपादक, गौरव प्रकाशन, अमरावती. 2007 पासून पत्रकारिता, साहित्य प्रकाशन, कथा, कविता, कादंबरी आणि ग्रामीण-शहरी घडामोडींवर लेखन. www.gauravprakashan.com चे संस्थापक व संपादक.