Sunday, October 26

‘झुंड’नं दिलं नाव, पण आयुष्याने मारलं ‘फाऊल’; बाबू छत्रीच्या हत्येनं हादरलं नागपूर!

‘झुंड’ फेम अभिनेता प्रियांशू क्षत्रिय उर्फ बाबू छत्रीचा मृतदेह सापडल्याने नागपूर हादरलं

नागपूर : सिनेमात ‘झुंड’चा खेळ खेळणारा अभिनेता, पण वास्तवात मात्र आयुष्याच्या खेळात पराभूत झाला. ‘झुंड’ फेम प्रियांशू क्षत्रिय उर्फ बाबू छत्रीचा निर्घृण खून करण्यात आल्याने नागपूर हादरलं आहे. ७ ऑक्टोबरच्या रात्री जरीपटका परिसरात ही थरारक घटना घडली.

पोलिसांना प्रियांशू अर्धनग्न अवस्थेत तारेनं बांधलेला आणि गंभीर जखमी अवस्थेत सापडला. त्याच्या शरीरावर चाकूचे अनेक वार होते. तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं, पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.

या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी संशयित लालबहादुर साहू याला अटक केली आहे. तपास सुरू आहे. प्रियांशू क्षत्रिय हा नागराज मंजुळेंच्या ‘झुंड’ चित्रपटात छोट्या पण ठसठशीत भूमिकेत झळकला होता. ‘बाबू छत्री’ या नावाने तो चर्चेत आला. पण प्रसिद्धीच्या प्रकाशात आलेला हा चेहरा नंतर गुन्ह्यांच्या सावलीत गेला.

सोन्याच्या दागिन्यांच्या चोरीसह अनेक गुन्ह्यांमध्ये त्याचं नाव आलं होतं. लोक म्हणतात, “झुंड” मध्ये फुटबॉल खेळणारा बाबू छत्री आयुष्याच्या मैदानावर ‘रेड कार्ड’ घेऊन बाहेर गेला!

बॉलिवूड हादरलं! ‘झुंड’ फेम अभिनेत्याची निर्घृण हत्या

Bandukumar Dhawane

बंडूकुमार धवणेबंडूकुमार धवणे – संपादक, गौरव प्रकाशन, अमरावती. 2007 पासून पत्रकारिता, साहित्य प्रकाशन, कथा, कविता, कादंबरी आणि ग्रामीण-शहरी घडामोडींवर लेखन. www.gauravprakashan.com चे संस्थापक व संपादक.