हिवाळ्यात लहान मुलांना होणारा न्यूमोनिया घातक असू शकतो !

Please follow and like us:
Facebook
X (Twitter)
Pinterest
LinkedIn
Instagram
हिवाळ्यात लहान मुलांना होणारा न्यूमोनिया घातक असू शकतो !
मुलांमध्ये आढळणाऱ्या सर्वात सामान्य रोगांपैकी एक म्हणजे न्यूमोनिया (Pneumonia). हा आजार कधीकधी खूप लवकर बरा होतो तर तर कधी कधी हा फार गंभीर होतो. हा आजार कोणत्याही ऋतूत होऊ शकतो, परंतु हिवाळ्यात त्याचा धोका वाढतो. कारण हिवाळ्यात आर्द्रतेमुळे जीवाणू झपाट्याने वाढतात, ज्यामुळे संसर्ग होतो. वेळीच काळजी न घेतल्यास हा आजार लहान मुलांसाठी घातक ठरू शकतो, त्यामुळे फक्त सर्दी आहे असे समजून त्याच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका.
न्यूमोनिया कोणत्याही वयोगटातील व्यक्तीला होऊ शकतो, परंतु हा आजार ५ वर्षांपेक्षा लहान मुलांमध्ये अधिक धोकादायक असतो. वेळेवर लक्ष न दिल्यास न्यूमोनियामुळे मुलांच्या फुफ्फुसात संसर्ग वाढतो, त्यामुळे ऑक्सिजनची पातळी घसरते. अनेक वेळा यामुळे अनेक मुलांना जीव गमवावा लागतो. त्यामुळे काही लक्षणे दिसताच ताबडतोब डॉक्टरांकडे जावे. मुलांमध्ये न्यूमोनियाचे कारण जीवाणू आणि विषाणूजन्य संसर्ग आहे, त्यामुळे ज्या मुलांची प्रतिकारशक्ती कमकुवत आहे त्यांना न्यूमोनियाला बळी पडण्याची शक्यता जास्त असते. त्याच वेळी, अशा मुलांना निमोनियाचा धोका जास्त असतो, ज्यांना आवश्यक लस वेळेवर दिली गेली नाही. ‘
काही मुलांना जन्मत: कमी वजन, अशक्तपणा इत्यादी मुळेही न्यूमोनिया होऊ शकतो. जर एखाद्या लहान मुलाला सर्दी झाली असेल आणि त्याला दूध प्यायला त्रास होत असेल तर, न्यूमोनियाचे लक्षण असू शकते. तसेच जर खूप थंडी वाजत असेल किंवा खूप घाम येत असेल, श्वास घेण्यास त्रास होत असेल, छातीत घरघर येत असेल, मूल सुस्त वाटत असेल किंवा श्वासोच्छवास जलद होत असेल तर ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या. लहान मुलांना संसर्ग होण्याची अधिक शक्यता असते. म्हणून त्यांना सर्दी आणि खोकल्याची लक्षणे असलेल्या लोकांपासून दूर ठेवा. याशिवाय लहान मुलांना गर्दीच्या ठिकाणी नेऊ नका.
याबरोबरच धुम्रपान करणाऱ्या ठिकाणांपासून आणि धुम्रपान करणाऱ्यांपासून दूर ठेवा. जर तुमचे मूल सहा महिन्यांपेक्षा लहान असेल तर जास्त काळजी घ्या. बाळाला फक्त आईचेच दूध पाजावे कारण आईचे दूध बाळाची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी उत्तम असते. जर मूल थोडे मोठे झाले असेल तर बाळाच्या आहाराची विशेष काळजी घ्या. तज्ज्ञांचा सल्ला घेतल्या नंतर तुम्ही डाएट चार्टनुसार अन्नही देऊ शकता.
*संकलन : मिलिंद पंडित,
कल्याण
(सौजन्य : ABP माझा)

Leave a comment