पर्यावरणविषयक घोषवाक्ये – रामदास पुजारी लिखित प्रभावी पुस्तिकेचा आढावा | पर्यावरण जनजागृती
सेवानिवृत्त सहायक वनसंरक्षक, कवी, लेखक रामदास पुजारी लिखित ‘पर्यावरणविषयक घोषवाक्ये’ ही पुस्तिका नुकतीच वाचण्यात आली. पर्यावरणाचा,भविष्याचा फारसा विचार न करता मानव आपल्या स्वार्थासाठी आज वृक्षतोड करताना दिसतो. रस्ते, औद्योगिकरण व इतर बाबींसाठी होत असलेली वृक्षतोड मानवाच्या, वन्यजीवांच्या, सृष्टीतील विविध घटकांच्या अस्तित्वासाठी व पर्यावरणासाठी अत्यंत धोकादायक आहे. पर्यावरणीय बदलांमुळे उद्भवणाऱ्या दुष्काळ,अतीवृष्टी, महापूर यांचे आरोग्यावर, जीवनावर होणारे परिणाम सर्वत्र प्रकर्षाने जाणवत आहेत. अशा वेळी पर्यावरणविषयक जनजागृतीसाठी रामदास पुजारी यांनी लिहिलेली पुस्तिका खूपच प्रभावी ठरते.
हे वाचा – महात्मा फुले यांचे शैक्षणिक कार्य व ग्रंथसंपदा
शुद्ध हवा, स्वच्छ पाणी जीवना हवे
वृक्षारोपण प्रत्येकाने करायलाच हवे
ह्या ओळी मानवी जीवनात पर्यावरणाचे किती महत्त्व आहे हे ठळकपणे अधोरेखीत करतात. माणसाला निरोगी आयुष्य जगण्यासाठी शुद्ध हवा आणि स्वच्छ पाणी हवे असल्याने त्यासाठी प्रत्येक माणसाने वृक्षारोपण करायला हवे असे लेखकाला म्हणतात…
वहावं शुद्ध पाणी नदी-नदीतून
वहावेत पर्यावरण विचार मना-मनातून
आज आपण पाहतो नदी, नाले, ओढे हे प्लास्टिक कचरा तसेच रसायनयुक्त सांडपाण्याने प्रदूषित झालेले आहेत. या समस्येवर नियंत्रणासाठी सर्वांनी सामूहिक प्रयत्न करायला हवेत. शुद्ध, स्वच्छ पाणी घेऊन ओढ्यांनी,नद्यांनी पूर्वीसारखेच अखंडपणे वाहत राहावे तसेच पर्यावरणपूरक विचारही प्रत्येकाच्या मनामध्ये सतत जोपासले जावेत ज्यायोगे पर्यावरणाचे रक्षण होईल असे लेखकाला वाटते.असायला हवी सर्वांना जाण
जपायला हवे देशी वाण
• नम्र निवेदन
“निर्भीड, नि:पक्ष, निस्पृह पत्रकारितेसाठी तुमचे सहकार्य गरजेचे आहे…”
लोकशाही मूल्यांची जपणूक, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची निष्ठा, आणि समाजजाणिवेची पायाभरणी हेच गौरव प्रकाशनचे ध्येय आहे. निर्भय, नि:पक्ष आणि लोकहितवादी पत्रकारिता हे आमचे बोधवाक्य आम्ही केवळ शब्दापुरते न ठेवता कृतीत उतरवत आहोत.
या सत्यशोधन आणि परिवर्तनाच्या प्रवासात तुमच्या आर्थिक सहकार्याची नितांत गरज आहे. आपले थोडेसे योगदान आमच्या निर्भय पत्रकारितेस बळ देऊ शकते. खालील QR कोड स्कॅन करून आपण आपल्या परीने मोलाचे सहकार्य करू शकता. चला, एकत्र येऊन समाजपरिवर्तनाच्या या वाटचालीत सहभागी होऊया. कारण खरी पत्रकारिता केवळ बातम्या देत नाही, तर भविष्यास आकार देते.
-बंडूकुमार धवणे
संपादक गौरव प्रकाशन

येथे ‘देशी वाण’ म्हणजे आपल्याकडे परंपरागत आलेले चांगले विचार, बी-बियाणे, वृक्षवेली यांना आपण पुढच्या पिढीसाठी जतन करून ठेवायला हवे. आज गावरान गाईचं दूध मिळेनासे झाले आहे, गावरान गवार, शेपू व इतर गावरान वाण मिळत नाहीत. आपली स्थानिक नैसर्गिक संपदा, देशी वाण जपून ठेवणे हे आपले आद्य कर्तव्य आहे.
पुस्तकाचे नाव : पर्यावरणविषयक घोषवाक्ये
लेखकाचे नाव : रामदास पुजारी
पृष्ठे : ४८
किंमत : ५० रुपये
– संदीप राठोड
(भूक छळते तेव्हा… कवितासंग्रहाचे कवी)
निघोज, 9922663595