
सेवेतून संस्कार NSS स्थापना दिनी विद्यार्थिनींचं श्रमदान
अमरावती : विदर्भ युथ वेलफेअर सोसायटी द्वारा संचालित इंदिराबाई मेघे महिला महाविद्यालयात दिनांक २४ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय सेवा योजना (NSS) स्थापना दिन साजरा करण्यात आला. या निमित्ताने महाविद्यालयात स्वयंसेविकांसाठी उद्बोधन कार्यक्रम तसेच विकसित भारत २०४७ या उपक्रमांतर्गत श्रमदानाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अजय कोल्हे यांनी भूषविले. प्रमुख अतिथी म्हणून डॉ. पुनम चौधरी (कार्यकारिणी सदस्य, विदर्भ युथ वेलफेअर सोसायटी) व मार्गदर्शक म्हणून राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. संजय काळे उपस्थित होते. त्यांनी राष्ट्रीय सेवा योजनेची पार्श्वभूमी, उद्दिष्टे आणि विद्यार्थ्यांच्या जीवनातील महत्त्व यावर सविस्तर मार्गदर्शन केले.
गृहअर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. सीमा अढाऊ यांनीही विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. या प्रसंगी बी.ए. भाग-२ च्या श्रुतिका हाडोळे हिला उत्कृष्ट स्वयंसेविका म्हणून गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अरुणा तसरे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रांजली तायडे हिने केले. मानसी मोहोड, श्रुतिका हाडोळे, अंजली पोकळे, संजना पोकळे, पायल पंडित, प्रांजली तायडे व समीक्षा खांडेकर या विद्यार्थिनींनी विशेष श्रमदान केले.या कार्यक्रमाला राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेविका व महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते.